Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काळजी घ्या ! साधा तापही मेडिकल इमर्जन्सी आणू शकतो हंताव्हायरस; डॉक्टरांनी दिला इशारा…

काळजी घ्या ! साधा तापही मेडिकल इमर्जन्सी आणू शकतो हंताव्हायरस; डॉक्टरांनी दिला इशारा…

2019 मध्ये जेव्हा कोव्हिड अर्थात कोरोना व्हायरस आला होता. तेव्हा संपूर्ण जगात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एका नव्या आजाराने डोके वर काढले आहे. हंताव्हायरस असे या व्हायरसचे नाव आहे. आतापर्यंत आठ केसेसची नोंद झाली आहे. याच तीन जणांचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत कोणाला संसर्ग होत नाही तोपर्यंत, फारसे बोलत नाहीत. हा संसर्ग दुर्मिळ आहे, परंतु तो अत्यंत धोकादायक मानला जातो.

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे याची सुरुवात एखाद्या सामान्य विषाणूजन्य आजारासारखी होते, त्यामुळे लोक अनेकदा याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. मात्र, काही दिवसांतच यामुळे फुफ्फुसांचे गंभीर नुकसान होऊ शकते. जेव्हा ताप आणि अंगदुखी सुरू होते, तेव्हा बहुतेक लोक डेंग्यू, स्वाइन फ्लू किंवा कोविडचा विचार करतात. हंताव्हायरस हा एक दुर्मिळ पण प्राणघातक संसर्ग आहे जो काही दिवसांतच फुफ्फुसांचे नुकसान करू शकतो आणि याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

याची लक्षणे लवकर जाणवत नाहीत. कोणालाही वाटू शकते की हवामानातील बदलामुळे होणारा हा एक सामान्य आजार आहे. रुग्णांना ताप, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी, उलट्या, मळमळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. बरेच लोक याला फ्लू किंवा अन्नातून विषबाधा समजून घरीच आराम करतात. सुरुवातीला, ही स्थिती गंभीर वाटत नाही, त्यामुळे या आजाराच्या धोक्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.

उंदीर आणि घुशींमुळे वेगाने होतोय संसर्ग

हा संसर्ग प्रामुख्याने उंदीर आणि घुशींसारख्या संक्रमित प्राण्यांमुळे पसरतो. हा विषाणू त्यांच्या मूत्र, लाळ आणि विष्ठेमध्ये असतो. जेव्हा लोक बऱ्याच काळापासून बंद असलेल्या खोल्या, गोदामे, शेत किंवा साठवण खोल्या स्वच्छ करतात, तेव्हा हे संसर्गाचे कण धुळीसोबत हवेत पसरतात आणि श्वासावाटे शरीरात जाऊ शकतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!