Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar : सुनील तटकरे-प्रफुल पटेल २२ आमदारांसह भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Rohit Pawar : सुनील तटकरे-प्रफुल पटेल २२ आमदारांसह भाजपमधून लढणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Rohit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीतील काही मोठे नेते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. “सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हे २२ आमदारांसह भाजपमधून निवडणूक लढवणार आहेत,” असा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला.

याशिवाय, सुनील तटकरे हे देखील भाजपमधून निवडणूक लढवू शकतात, असा दावाही त्यांनी केला. तसेच शिवसेना पक्षातील काही आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

दरम्यान, सुनील तटकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असताना रोहित पवारांनी टोला लगावत, “कदाचित तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल,” अशी मिश्कील टिप्पणी केली.

मात्र, सुनील तटकरे यांनी या भेटीला पूर्णपणे गैरराजकीय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही सदिच्छा भेट होती आणि कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.

तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “शरद पवार यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय जडणघडण झाली. त्यामुळे त्यांची भेट घेणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्या पदांबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या दोन्ही नेत्यांच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!