Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत 14 ऐतिहासिक निर्णय; नोकरभरतीपासून ते शेतकरी हितापर्यंत महत्त्वाच्या घोषणा

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत 14 ऐतिहासिक निर्णय; नोकरभरतीपासून ते शेतकरी हितापर्यंत महत्त्वाच्या घोषणा

Cabinet Decisions : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या प्रगतीला नवा वेग देणारे 14 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. प्रशासन, शेती आणि पायाभूत सुविधांना बळ देण्यासोबतच आरक्षणाच्या नियमातही सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आगामी काळातील सरकारी रणनीतीचा कल या निर्णयांतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

1. धरणांची साठवणूक वाढणार, शेतकऱ्यांना ‘सुपीक’ लाभ
राज्यातील 6 मोठ्या धरणांमधील साचलेला गाळ काढण्यासाठी सुधारित धोरणास हिरवा कंदील देण्यात आला आहे. यामुळे केवळ जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार नाही, तर तो सुपीक गाळ शेतात टाकून शेतकऱ्यांना आपले उत्पन्न वाढवता येणार आहे.

2. आरक्षणाचे नियम बदलले; सवलत घेतल्यास ओपनमध्ये संधी नाही
नोकरभरतीमध्ये आरक्षणाबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या उमेदवाराने वय, शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव यामध्ये राखीव प्रवर्गातून सवलत घेतली असेल, तर त्यांची नियुक्ती आता केवळ त्याच प्रवर्गात केली जाईल. अशा उमेदवारांना खुल्या (General) प्रवर्गातील जागांवर हक्क सांगता येणार नाही.

3. प्रादेशिक विकासावर भर (कोकण, नाशिक आणि पुणे)

  • सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना पुढील 3 वर्षांसाठी कायम ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
  • नाशिकसाठी भरीव तरतूद: नाशिकमधील अंबोली-वेळुंजे पाणी प्रकल्पासाठी 49 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, रिंग रोडसाठी जमीन खरेदी करणाऱ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत मिळणार आहे.
  • पुणे नदी पुनरुज्जीवन: मुळा-मुठा नदी प्रकल्पासाठी संगमवाडी आणि बॉटेनिकल गार्डन परिसरातील 3 शासकीय जमिनी महापालिकेकडे मोफत हस्तांतरित केल्या जाणार आहेत.

4. सामाजिक न्याय आणि प्रशासन

  • आयोगांचे बळकटीकरण: राज्य अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) आयोगांसाठी आता नव्याने उपाध्यक्ष पदांची निर्मिती केली जाणार आहे.
  • आश्रमशाळा शिक्षकांना न्याय: विजाभज प्रवर्गातील खाजगी आश्रमशाळा शिक्षकांना आता वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळतील.

5. इतर धोरणात्मक बदल आणि सवलती

  • आरोग्य पायाभूत सुविधा: वैद्यकीय संस्थांच्या इमारती बांधताना विकास शुल्कामध्ये दिली जाणारी सवलत आता 25% वरून 50% करण्यात आली आहे.
  • मृद व जलसंधारण भरती: या विभागात 2284 नवीन पदांची भरती करण्यास आणि क्षेत्रीय पुनर्रचनेला मान्यता मिळाली आहे.
  • संत्रा निर्यात धोरण: बांगलादेशला संत्री निर्यात करताना दिली जाणारी अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून भविष्यात थेट शेतकऱ्यांच्या हिताचे नवे धोरण आखता येईल.
  • साहित्य गौरव: नाशिकच्या प्रसिद्ध कुसुमाग्रज प्रतिष्ठानला दरवर्षी 10 लाख रुपयांचे शासकीय अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे.

या निर्णयांचा नेमका परिणाम काय?
या निर्णयांच्या जोरावर सरकारने एकाच वेळी राज्यातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार युवक, शासकीय कर्मचारी आणि संस्थात्मक क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे. यामुळे विशेषतः कोकण, नाशिक आणि पुणे या भागांतील पायाभूत कामांना मोठी गती मिळणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!