Today शुक्रवार, 3rd जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना झटका! शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर कोर्टात नेमकं काय घडलं?

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना झटका! शिवसेना पक्ष-चिन्ह वादावर कोर्टात नेमकं काय घडलं?

Shiv Sena Symbol Dispute: शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या प्रलंबित वादावर आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या वकिलांनी सुनावणीत होणाऱ्या विलंबाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता, सरन्यायाधीशांनी त्यांना कडक शब्दांत सुनावले. “तुमचे नेते न्यायालयाच्या कामकाजावर जी विधाने करत आहेत, ती अत्यंत अशोभनीय आहेत,” अशा शब्दांत कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 जुलै रोजी होणार आहे.

नेमका पेच कुठे रंगला?
ठाकरे गटाचे वकील ॲड. देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, “आम्ही गेल्या 3 वर्षांपासून या निकालाची प्रतीक्षा करत आहोत, त्यामुळे ही सुनावणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी.” यावर खंडपीठाने आक्रमक पवित्रा घेतला. सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, सुनावणीच्या तारखा ठरणारच आहेत, मात्र विलंबाचे खापर न्यायालयावर फोडणे चुकीचे आहे.

सरन्यायाधीशांचे ‘खडे बोल’:
‘आम्ही रोज दुपारी 4 वाजेपर्यंत बसून काम करतो. जर कोणाला वाटत असेल की आम्ही रिकामे बसलो आहोत, तर ते चुकीचे आहे. न्यायालयाच्या प्रतिमेला तडा जाईल अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत,’ असं सरन्यायाधीशांनी म्हटलं. ठाकरे गटाच्या राजकीय नेत्यांनी न्यायालयावर केलेल्या टिप्पणीचा संदर्भ देत कोर्टाने वकिलांना आपल्या नेत्यांना आवर घालण्याची तंबी दिली.

शिंदे गटाचा आक्षेप आणि कोर्टाचा निर्णय
शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेचा निषेध केला. “न्यायालयावर कामाचा प्रचंड भार आहे याची सर्वांना कल्पना असावी, विनाकारण आरोप करणे चुकीचे आहे,” असे रोहतगी यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने ही सुनावणी आता न्यायालयाच्या सुट्टीनंतर म्हणजेच 30 जुलै रोजी घेण्याचे निश्चित केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!