Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मान्सूनची वेगवान आगेकूच! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; पुढील 3-4 दिवस निर्णायक

मान्सूनची वेगवान आगेकूच! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; पुढील 3-4 दिवस निर्णायक

Monsoon Rain : देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने प्रगती करत अंदमान-निकोबार बेटांवर पूर्णपणे हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत ताजी माहिती दिली आहे.

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 18 मे 2026 रोजी मान्सूनने अंदमान समुद्राचा बहुतांश भाग व्यापला असून संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये अधिकृत आगमन झाले आहे. तसेच आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील काही भागांतही मान्सून सक्रिय झाला आहे.

पुढील 3 ते 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसांत मोसमी वारे आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे.

मान्सून आग्नेय अरबी समुद्र, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागरातील उर्वरित क्षेत्र व्यापण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

यंदा केरळात मान्सूनचे लवकर आगमन शक्य

सामान्यतः 1 जूनला केरळात पोहोचणारा मान्सून यंदा वेळेआधी म्हणजेच 26 मे रोजी केरळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढल्याचे सांगितले जात आहे.

चक्रीवादळ नसल्याने मान्सूनचा प्रवास सुरळीत

मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतेही चक्रीवादळ सक्रिय नसल्याने त्याच्या पुढील वाटचालीत मोठा अडथळा येणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गोवा, कोकण आणि पुण्यासाठीही अंदाज

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 5 जूनपर्यंत गोव्यात पोहोचू शकतो. त्यानंतर 6 जूनपर्यंत कोकणात आणि 7 जूनपर्यंत पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!