Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना केंद्रात मोठी जबाबदारी

Medha Kulkarni : भाजप खासदार मेधा कुलकर्णींना केंद्रात मोठी जबाबदारी

Medha Kulkarni : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पुण्याच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णीं यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने आणि हवामान बदल विषयक संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत डॉ. मेधा कुलकर्णी यांची समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती यांच्या मान्यतेनंतर ही नियुक्ती निश्चित करण्यात आली असून १८ मे २०२६ पासून ती तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी नियुक्तीचे अधिकृत पत्र जारी केले.

या समितीकडे देशातील विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित महत्त्वाच्या धोरणांचा अभ्यास करण्याची जबाबदारी असते. विविध विधेयके, प्रकल्प आणि विकासकामांवर समितीची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे मेधा कुलकर्णी यांच्याकडे आता केंद्रातील अत्यंत प्रभावी आणि धोरणात्मक जबाबदारी आल्याचे मानले जात आहे.

पुण्याच्या माजी आमदार राहिलेल्या डॉ. मेधा कुलकर्णी यांना यापूर्वी संसदेतील सक्रिय आणि अभ्यासू कामगिरीसाठी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी ठोस काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.”

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!