Today बुधवार, 5th ऑगस्ट 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा पहिला मोहरा निश्चित? पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा पहिला मोहरा निश्चित? पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत रस्सीखेच

Vidhanparshad Election : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचालींना वेग आला आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याबाबतची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विप्लव बाजोरिया यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर बाजोरिया यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मंगळवारी त्यांनी वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली.

विप्लव बाजोरिया यांनी यापूर्वीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून त्यांचे वडील गोपीकिशन बाजोरिया यांनीही विधान परिषदेत सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आता गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला असून त्यासाठी त्यांनी शिंदे यांच्याकडे जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

पुणे जागेवर राष्ट्रवादीचा ठाम दावा

दरम्यान, पुणे विधान परिषद जागेवरून महायुतीतील भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. रिक्त झालेल्या या जागेवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले निवडून आले होते. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीलाच मिळावी, असा आग्रह पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसकडून धरण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक असल्याचा दावा स्थानिक पदाधिकारी करत आहेत. राष्ट्रवादीकडे सुमारे ३४४ प्रतिनिधी तर भाजपकडे ३०६ प्रतिनिधी असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना (शिंदे गट) कडे ६८ सदस्य असल्याने महायुतीत फूट न पडल्यास उमेदवार सहज विजयी होऊ शकतो, असे राजकीय समीकरण मानले जात आहे.

इच्छुकांची संख्या वाढली

या जागेसाठी माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे आणि भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची चर्चा आहे. यापैकी एखाद्याला संधी द्यावी, अशी मागणी समर्थकांनी केली आहे.

दुसरीकडे भाजपदेखील ही जागा सोडण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीतच मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!