Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कुऱ्हाडीच्या हल्ल्यात पत्नीचा निर्घृण खून; जुन्नर तालुक्यातील घटना

कुऱ्हाडीच्या हल्ल्यात पत्नीचा निर्घृण खून; जुन्नर तालुक्यातील घटना

जुन्नर (पुणे): नवऱ्याच्या घरी आपली महत्वाची कागदपत्रे मोबाइल परत घेण्याकरिता गेलेल्या पत्नी बरोबर नवरा व त्याच्या आईचे जोरदार वाद होऊन प्रापंचिक रागाच्या भरात त्याने कोयता, कुऱ्हाडीने हल्ला करुन निर्घृण हत्या केली. ही घटना जुन्नरच्या आदिवासी भागातील घंगाळदरे या गावात शुक्रवारी (दि. २१) भरदुपारी घडली. या प्रकरणी नवरा, त्याची आई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील आईला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अलका शंकर बांबळे, (वय ३३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी शंकर बारकू बांबळे, लिलाबाई बारकू बांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली.

शंकर व लिलाबाई या घटनेनंतर गावा लगतच्या घनदाट जंगलात पळून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर सुमारे ५० पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तसेच जुन्नर वन विभागाच्या ड्रोनच्या साहाय्याने जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवूनसुद्धा हे दोघे सापडू शकले नाहीत. शनिवारी (दि.२२) लिलाबाई यांना सकाळी पोलीसांनी ताब्यात घेतले. तर शंकर हा अजूनही फरारी आहे. अलका ही प्रापंचिक रागामुळे नवऱ्या समवेत राहत नव्हती. घोडेगाव येथे ती राहत होती. शुक्रवारी ती काही महिलांना घेऊन घंगाळदरे येथे आपली महत्वाची कागदपत्रे व मोबाइल नवऱ्याच्या घरून घेऊन जाण्याकरिता आली होती. यावेळी तेथील घरामध्ये शंकर व लिलाबाई आणि अलका यांच्यात जोरदार वाद झाले. यावेळी रागाच्या भरात शंकरने कुऱ्हाड , कोयता घेऊन अलकाच्या शरीरावर वार केल्याने, ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला.

या घटनेची खबर राजश्री विरणक (रा. मुलुंड मुंबई) यांनी जुन्नर पोलिसांना दिली. या घटनेच्या वेळी त्या स्वतः समक्ष हजर होत्या. घटना घडत असताना त्या आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असल्याचे पाहून शंकर व त्याच्या आईने त्यांनाही मारण्याची धमकी दिली होती. या घटनेतील फरार आरोपीचा शोध सुरू असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप मोरे, अंमलदार विजय जंगम पुढील तपास करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!