पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे रिक्त पदावर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे विशेष शिक्षण शिक्षक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला खडकी, पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत दोन रिक्त पद भरले जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०२६ ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. यात वयोमर्यादाही ठरवण्यात आली आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://kirkee.cantt.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : विशेष शिक्षण शिक्षक.
– एकूण रिक्त पदे : 02 पदे
– नोकरीचे ठिकाण : खडकी, पुणे.
– वेतन / मानधन : दरमहा रु. २४५००/-.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : ०३ जून २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता.
– मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलच्या आवारातील स्वाभिमान केंद्र, खडकी, पुणे-४११००३.


