Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime : पुण्यात आयटी क्षेत्र हादरलं! बॉयफ्रेंडच्या मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Pune Crime : पुण्यात आयटी क्षेत्र हादरलं! बॉयफ्रेंडच्या मानसिक छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणीची आत्महत्या

Pune Crime : पुण्यातील खराडी परिसरात राहणाऱ्या आयटी क्षेत्रातील 23 वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या वाद आणि कथित मानसिक छळामुळे तरुणीने मुळा-मुठा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून, पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

मृत तरुणी निकिता (वय 23) ही खराडी परिसरातील सिद्धिविनायक पीजीमध्ये राहत होती. 6 मे रोजी दुपारच्या सुमारास तिने मुंढवा पुलावरून मुळा मुठा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान चैतन्य संजय काकडे हा निकिताचा नातेवाईक असून दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. काही काळानंतर चैतन्यकडून निकिताचा मानसिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. सततच्या त्रासाला कंटाळून निकिताने टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीच्या आधारे खराडी पोलिसांनी चैतन्य कानडेविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. आंबेगाव पठार परिसरातील सर्व्हे नं. १६ येथे रात्री दीडच्या सुमारास तीन कोयताधारी युवकांनी परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींनी एका रिक्षावर कोयत्याने वार करत नुकसान केले, तसेच एका ECCO वाहनाच्या काचा फोडून तोडफोड केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!