Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू; काय सुरू अन् काय बंद?

Pune Curfew : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू; काय सुरू अन् काय बंद?

Pune Curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील आंदोलनांची शक्यता आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पुणे शहरात मंगळवार रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात मोर्चे, आंदोलने, सभा आणि मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१), (२) आणि (३) अंतर्गत हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. जमावबंदी हा सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी वापरला जाणारा महत्त्वाचा कायदेशीर उपाय मानला जातो.

प्रशासनाच्या आदेशानुसार, या कालावधीत कोणत्याही प्रकारचे शस्त्र, लाठ्या, दगड, भाले, तलवारी, बंदुका किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्फोटके, ज्वलनशील पदार्थ किंवा धोकादायक साहित्य जवळ बाळगण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय, भडकाऊ घोषणा देणे, मोठ्याने घोषणाबाजी करणे, सार्वजनिक टीका, उत्तेजक गाणी किंवा भाषणे करणे, वाद्य वाजवणे तसेच सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या कृतींवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक पुतळे, फोटो किंवा प्रतिमांचे प्रदर्शन अथवा दहन करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे आदेश आवश्यक आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, पोलिसांना धोकादायक वस्तू जप्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पुणेकरांनी या काळात नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!