Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pimpri Chinchwad Crime : बस स्टँडवर तरुणीसमोर अश्लील कृत्य; धाडसी तरुणीच्या व्हिडिओमुळे आरोपी जेरबंद

Pimpri Chinchwad Crime : बस स्टँडवर तरुणीसमोर अश्लील कृत्य; धाडसी तरुणीच्या व्हिडिओमुळे आरोपी जेरबंद

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड शहरातून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणारी संतापजनक घटना समोर आली आहे. सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलावरील बीआरटी बसस्थानकावर एका माथेफिरू तरुणाने सार्वजनिक ठिकाणी तरुणीसमोर अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला. मात्र पीडित तरुणीने दाखवलेल्या धाडसामुळे आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

ही घटना २१ मे रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास एम्पायर इस्टेट बीआरटी येथे घडली. २१ वर्षीय तरुणी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत उभी होती. सकाळची वेळ असल्याने बसस्थानकावर गर्दी कमी होती. याचाच फायदा घेत आधीपासून बाकावर बसलेल्या एका तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने सार्वजनिक ठिकाणी हस्तमैथुन करत तरुणीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. सुरुवातीला घाबरलेल्या तरुणीने नंतर धैर्य दाखवत मोबाईलमध्ये संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले. तिने आरोपीला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला धमकावत घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर पीडित तरुणीने थेट पिंपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. मोबाईल फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आरोपी जाकीर शेख याला अटक केली आहे.

या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!