पुणे : बँकेत नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, कुर्ला नागरी सहकारी बँक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळू शकतो.
कुर्ला नागरी सहकारी बँक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक – बँकिंग, व्यवस्थापक – कर्ज या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापक – बँकिंग, व्यवस्थापक – कर्ज.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० मे २०२६.
– अर्ज पाठवण्याचा ई- मेल आयडी : admin1@kns.bank.in
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.knsbl.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे


