Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raj Thackeray: ‘जात, धर्म आणि अफवांच्या राजकारणात महाराष्ट्र भरकटतोय…’; सावरकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा सत्ताधारी-विरोधकांवर निशाणा

Raj Thackeray: ‘जात, धर्म आणि अफवांच्या राजकारणात महाराष्ट्र भरकटतोय…’; सावरकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचा सत्ताधारी-विरोधकांवर निशाणा

Raj Thackeray: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या राजकारणी आणि समाजव्यवस्थेचे कडक शब्दांत कान टोचले आहेत. सावरकरांच्या नावावर केवळ मतांचे राजकारण करणाऱ्या नेत्यांना त्यांनी समाजमाध्यमांवरील एका धारदार आणि खरमरीत पोस्टद्वारे थेट आरसा दाखवला. “सावरकरांचा उदोउदो करणाऱ्यांना आणि त्यांचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत?” असा जळजळीत सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आपल्या या पोस्टमधून त्यांनी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांवरही निशाणा साधत महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक अधोगतीवर तीव्र चिंता व्यक्त केली.

बुद्धीप्रामाण्यवाद विसरून महाराष्ट्र ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’च्या आहारी; राज ठाकरेंचे गंभीर मुद्दे
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रामुख्याने सावरकरांच्या मूळ विचारांची आणि आजच्या परिस्थितीची तुलना केली आहे. ते म्हणाले की, सावरकरांच्या टीकाकारांना ते कधी झेपलेच नाहीत, पण दुसरीकडे त्यांच्या नावावर मते मागणारांनी तरी सावरकर नीट वाचलेत का, अशी शंका येते. बुद्धीला पटेल तेच स्वीकारणारे सावरकर या लोकांना कधीच समजले नाहीत. सावरकरांचा कोणत्याही व्यक्तीच्या उदोउदोला विरोध होता आणि प्रत्येक गोष्ट विज्ञान तसेच तर्काच्या कसोटीवर घासून पाहण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र, आजचा महाराष्ट्र ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मधील खोट्या संदेशांवर कसलाही विचार न करता अंधळेपणाने विश्वास ठेवत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

धर्मांधता, जातीवाद आणि भोंदूगिरीवर कडाडून टीका
सावरकरांच्या विचारसरणीचा हवाला देत राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय पर्यावरणावर प्रखर हल्ला चढवला. सावरकर प्रखर हिंदू अभिमानी असले, तरी त्यांनी धर्मातील त्रुटींवर नेहमीच कडाडून टीका केली आणि जाती अंतासाठी लढा दिला. मात्र, दुर्दैवाने आज त्याच महाराष्ट्रात सावरकरांचे नाव वापरून धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे आणि जातीवरून डोकी फोडली जात आहेत, ज्याला सत्ताधाऱ्यांचेच खतपाणी लाभत असल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा विसरून सध्याचे राजकारणी भोंदू बाबांच्या आहारी गेले असून तरुणाईला केवळ डीजे आणि उत्सवांमध्ये गुंडाळून ठेवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


तर्काच्या कसोटीवर तपासणे हीच खरी श्रद्धांजली; राजकीय वर्तुळात खळबळ
पोस्टचा शेवट करताना राज ठाकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “आपण कोण होतो हेच जर विसरलो, तर प्रगतीचा मार्ग कसा शोधणार? जर आपण सत्तेसाठी हपापलेले राजकारणी आणि व्हॉट्सॲपवरील खोट्या नरेटिव्ह्जवर अवलंबून राहणार असू, तर महाराष्ट्राचे भविष्य कठीण आहे. सावरकरांच्या विचारांनुसार प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल; अन्यथा तो केवळ एक उपचार ठरेल.” राज ठाकरे यांच्या या धारदार विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. केवळ सावरकरांच्या नावाचे राजकारण करणाऱ्या दोन्ही बाजूंना राज ठाकरेंनी या निमित्ताने आत्मपरीक्षण करायला भाग पाडले असून, आता या टीकेला सत्ताधारी आणि विरोधक काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!