Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मानलेला भावाने केला विश्वासघात, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने केला अत्याचार

मानलेला भावाने केला विश्वासघात, विवाहितेला प्रियकरासह लॉजवर घेऊन गेला अन् आळीपाळीने केला अत्याचार

बार्शी : मानलेल्या भावाने आणि प्रियकराने मिळून ३४ वर्षीय विवाहित महिलेला कारमधून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेऊन तेथे बेल्टने मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सामूहिक अत्याचार केला. भाऊ बहिणीच्या नात्याला व माणुसकीला काळिमा फासण्याचा प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडला. सुरेश परसु माळी व संतोष भास्कर भानवसे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. अटक करून या दोघांना बार्शी न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत पिडीत ३४ वर्षीय पिडितेने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा नवरा पुण्यात सेंट्रींग काम करतो, तर मुलगी बार्शीत शिक्षणास आहे. त्यामुळे ती गेल्या तीन महिन्यांपासून मुलीकडेच राहते. संबंधित पिडितेचे सुरेश परसु माळी याच्यासोबत सुमारे सात वर्षांपासून प्रेमसंबध आहेत. तसेच सुरेशचा मित्र संतोष भानवसे हा पीडित महिलेस बहीण मानत होता. सप्टेंबर महिन्यात सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे पुण्यातून पीडितेला बार्शीकडे न्यायला आले. परंतु, पीडितेने त्यांना नकार देताच सुरेशने तिला मारहाण केली. पुढे महिला बार्शीत आल्यावर संतोषने सांगितले की, तू माझी बहीणं आहेस. तुझं सुरेश एकतो. त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमव. तेव्हा सुरेश याच्याशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळविले.

त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी पिडिता लग्नाला आली होती. लग्न झाल्यानंतर पीडित महिलेचे पती हे जास्त दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास या दोघांनी मिळून पीडित महिलेस चल तुला घरी तुझ्या गावी घेऊन जातो, असे म्हणत सुरेश माळी याने त्याच्या स्वीफ्ट गाडीमध्ये बसवून कुडूवाडी रस्त्यावरील लॉजवर नेले. तिथेच सुरेश माळी आणि संतोष भानवसे यांनी आळीपाळीने महिलेवर अत्याचार केला. तसेच, तू गावात राहायचे नाही. तू पुण्यात जाऊन राहायचे. जर पोलिसात तक्रार दिली, तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देखील दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने करत आहेत

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!