Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maratha Reservation: डोक्यावर भगवा, ४० डिग्रीचं ऊन… आंतरवाली सराटीत जरांगेंचं आमरण उपोषण सुरू

Maratha Reservation: डोक्यावर भगवा, ४० डिग्रीचं ऊन… आंतरवाली सराटीत जरांगेंचं आमरण उपोषण सुरू

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी १० वाजल्यापासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मे महिन्याच्या ४० अंशाच्या रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता, डोक्यावर भगवा गमछा गुंडाळून आणि मोकळ्या मैदानात केवळ एका बाजेवर ठाण मांडून त्यांनी आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या नव्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

शिस्त राखण्यासाठी अनोखा ‘काठी’ पवित्रा
आंदोलनस्थळी कोणताही गोंधळ होऊ नये किंवा आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी जरांगे पाटील यांनी यावेळी एक अत्यंत वेगळा आणि कडक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतः हातात काठी घेऊन जमिनीवर एक रेषा ओढली आणि सर्व सहकारी व आंदोलकांना शिस्त राखण्याचे आवाहन केले. उपस्थित जनसमुदायाने हातात काठ्या घेऊन या रेषेच्या पलीकडे, एका निश्चित अंतरावर शांततेत बसावे, जेणेकरून आंदोलनाची शिस्त भंग होणार नाही, अशी कडक नियमावलीच त्यांनी आखून दिली आहे. त्यांच्या या अनोख्या ‘काठी’ पवित्र्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

रात्री उशिरापर्यंत चाललेली सरकारी शिष्टमंडळाची मनधरणी अपयशी
दरम्यान, हे उपोषण रोखण्यासाठी शासनाकडून शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. काल रात्री (२९ मे) सरकारच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने आंतरवाली सराटीत धाव घेऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या बैठकीत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याशी जवळपास दीड तास बंद दाराआड सविस्तर चर्चा केली. “सरकार मराठा आरक्षणाबाबत पूर्णपणे सकारात्मक आहे,” अशी ग्वाही देत विखे पाटलांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने सरकारचे हे मनधरणीचे प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरले आणि अखेर आजपासून हे आंदोलन पुन्हा सुरू झाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!