Bhimashankar Temple : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचे दरवाजे अखेर १५ जूनपासून भाविकांसाठी खुले होणार आहेत. जवळपास पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. आता काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने भाविकांना पुन्हा दर्शनाची संधी मिळणार आहे. (Bhimashankar Temple)
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिर ९ जानेवारीपासून भाविकांसाठी बंद होते. मंदिराच्या मुख्य सभामंडपाची पुनर्बांधणी, परिसरातील विकासकामे आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सुमारे २८८ कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. (Bhimashankar Temple)
मंदिरातील बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून सभामंडप, डोम आणि पायऱ्यांच्या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामे पुढील काही दिवसांत पूर्ण करून १५ जूनपासून मंदिर दर्शनासाठी सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. (Bhimashankar Temple)
दरम्यान, वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने विशेष नियमावली लागू केली आहे. ५ जूनपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार असून, दररोज केवळ १,००० भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. १५ ते ३० जून या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. (Bhimashankar Temple)
ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांना वैध ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आगाऊ नोंदणी करूनच मंदिरात भेट देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Bhimashankar Temple)


