Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीने अखेर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात 17 जागांवर एकमत झाले असून उमेदवारांची यादीही समोर आली आहे. अंतिम वाटपानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
भाजपच्या 11 उमेदवारांची यादी
वर्धा चंद्रपूर गडचिरोली- अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
अमरावती- प्रवीण पोटे
सोलापूर- राजेंद्र राऊत
सांगली सातारा- धैर्यशील कदम
अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
नांदेड – अमर राजूरकर
धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
जळगाव- नंदकिशोर महाजन
नागपूर- राजीव पोतदार
शिवसेनेच्या 4 उमेदवारांची यादी
ठाणे- रवींद्र फाटक
नाशिक- नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली- सईद खान
यवतमाळ- दुष्यंन्त चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 उमेदवारांची यादी
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
पुणे- विक्रम काकडे (संभाव्य उमेदवार)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे या 17 जागा गेल्या दोन अडीच वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 1 जून असून मतदान 18 जूनला होणार आहे. तर मतमोजणी 22 जून रोजी पार पडणार आहे.
या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी काही ठिकाणी नाराज इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता अद्याप कायम आहे.


