Today सोमवार, 26th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: ST चालकाचा बेजबाबदारपणा; गतिरोधकाच्या झटक्याने प्रवासी तरुणीचा मणका निकामी; कायमचे अपंगत्व

Pune News: ST चालकाचा बेजबाबदारपणा; गतिरोधकाच्या झटक्याने प्रवासी तरुणीचा मणका निकामी; कायमचे अपंगत्व

Pune News: पुण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकाने दाखवलेल्या अतिघाईमुळे एका तरुण प्रवाशाला आपले आरोग्य गमवावे लागले आहे. जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील खडकी रेल्वे स्टेशन परिसरात ही धक्कादायक घटना घडली. भरधाव बस एका स्पीड ब्रेकरवरून अत्यंत वेगाने गेल्याने, मागच्या सीटवर बसलेल्या २३ वर्षीय तरुणीला गंभीर दुखापत झाली. या भीषण झटक्यामुळे तिची कंबर आणि मणका फ्रॅक्चर झाला असून, तिच्या शरीराची नैसर्गिक संवेदना पूर्णपणे नाहीशी झाली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणे गाडी चालवून प्रवाशाच्या जीवास धोका निर्माण केल्याबद्दल बस चालक रोशन तानाजी खैरनार (वय ३६, रा. नाशिक) याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मामाच्या गावाला जाताना काळाचा घाला 

हडपसर येथे राहणारी पीडित तरुणी २७ मे रोजी रात्री आपल्या भावासोबत वाकडेवाडीहून ‘पुणे-सटाणा’ या बसने पिंपळगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. खडकी स्टेशनजवळ चालकाने गतीचा अंदाज न घेता बस थेट गतिरोधकावरून उडवली. हा थरार इतका मोठा होता की, दोघेही बहीण-भाऊ जागेवरून हवेत उडून खाली कोसळले. तरुणीच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागल्याने भावाने चालकाला तात्काळ बोपोडीतील रुग्णालयात गाडी घेण्यास भाग पाडले. मात्र, तिथे पुरेशी सोय नसल्याने तिला शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलवावे लागले. सुरुवातीला डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तिचा त्रास असह्य झाला. पुन्हा रुग्णालयात तपासणी केली असता, मणक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आणि शरीराची हालचाल पूर्णपणे थांबल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर तरुणीने बेडवरूनच पोलिसांत तक्रार दिली.

दुसऱ्या एका दुर्दैवी घटनेत, उरण शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या एका भयानक दुचाकी अपघातामध्ये दोन जिवलग मित्रांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. रात्री दोनच्या सुमारास मोरा रस्त्यावरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यामध्ये महेश चांदेकर (३५) आणि निखिल कुकडे (३८) हे दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात एवढा तीव्र होता की दुचाकीचा पूर्ण कोळसा झाला. नागरिकांनी दोघांना उरणच्या शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, उरणमध्येच आणखी एक धक्कादायक घटना घडली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक क्रिकेट स्पर्धेत खेळणारा महेश भोईर हा तरुण सामना संपवून घरी परतला होता. मैदानावर खेळत असतानाच त्याची तब्येत खालावली होती. घरी आल्यानंतर अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. या लागोपाठच्या घटनांमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!