Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Salon Price Hike : सलून सेवांचे दर 20 टक्क्यांनी वाढले; कटिंग, दाढीपासून फेशियलपर्यंत सर्व सेवांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

Salon Price Hike : सलून सेवांचे दर 20 टक्क्यांनी वाढले; कटिंग, दाढीपासून फेशियलपर्यंत सर्व सेवांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

Salon Price Hike : वाढत्या महागाईचा फटका आता सलून व्यवसायालाही बसला असून राज्यभरातील सलून सेवांच्या दरात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांनी घेतलेल्या निर्णयानुसार नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

इंधन दरवाढ, सौंदर्यप्रसाधनांच्या वाढलेल्या किमती, व्यावसायिक वीजबिले, दुकानभाडे आणि इतर खर्चात झालेली वाढ यामुळे सलून व्यावसायिकांवर आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे व्यवसाय टिकवण्यासाठी आणि कारागिरांचा उदरनिर्वाह सुरळीत ठेवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल, हेअर ट्रिटमेंट आणि मेकअपसारख्या सेवांसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

नवीन दर (प्रिमियम सलून)

  • दाढी : 200 ते 500 रुपये
  • कटिंग : 500 ते 1000 रुपये
  • हेअर कलर : 700 ते 1000 रुपये
  • फेशियल : 2000 ते 3000 रुपये
  • हेअर ट्रिटमेंट : 3000 ते 5000 रुपये
  • ब्रायडल मेकअप : 7000 ते 10000 रुपये
  • ग्रुम मेकअप : 2000 ते 4000 रुपये

एसी सलूनमधील दर

  • दाढी : 100 ते 200 रुपये
  • कटिंग : 150 ते 350 रुपये
  • हेअर कलर : 300 ते 500 रुपये
  • फेशियल : 500 ते 1500 रुपये
  • हेअर ट्रिटमेंट : 1500 ते 3000 रुपये
  • ब्रायडल मेकअप : 3000 ते 7000 रुपये
  • ग्रुम मेकअप : 1000 ते 3000 रुपये

ग्रामीण भागातील सलूनचे दर

  • दाढी : 50 ते 70 रुपये
  • कटिंग : 80 ते 100 रुपये
  • हेअर कलर : 80 ते 100 रुपये
  • फेशियल : 200 ते 500 रुपये
  • हेअर ट्रिटमेंट : 200 ते 500 रुपये
  • ब्रायडल मेकअप : 1500 ते 3000 रुपये
  • ग्रुम मेकअप : 500 ते 1500 रुपये

सलून व्यावसायिकांच्या मते, अनेक वर्षे कमी नफ्यात व्यवसाय सुरू ठेवला जात होता. मात्र वाढत्या खर्चामुळे जुने दर कायम ठेवणे अशक्य झाले होते. त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना आता सलून सेवांसाठी वाढीव दरांचा सामना करावा लागणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!