Today शुक्रवार, 12th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणेकरांनो लक्ष द्या! 10 दिवस जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुणेकरांनो लक्ष द्या! 10 दिवस जड वाहनांना ‘नो एन्ट्री’; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Traffic Update : पुणे शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जून ते 24 जून या कालावधीत शहरात जड आणि अवजड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व जड वाहनांना पुणे शहरात ‘नो एन्ट्री’ लागू राहणार आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2026 पासून आतापर्यंत जड वाहनांमुळे पुण्यात 30 गंभीर अपघात घडले असून त्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थापन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कालावधीत शहरातून जाणाऱ्या ट्रक, कंटेनर आणि इतर अवजड वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

सोलापूरकडून मुंबईकडे जाणारी वाहने :

केडगाव चौफुला – न्हावरे – शिक्रापूर – चाकण मार्गे किंवा उरळी कांचन – कोरेगाव मूळ – आष्टापूर – शिक्रापूर – चाकण मार्गे वळविण्यात येतील.

मुंबईकडून सोलापूरकडे जाणारी वाहने :

तळेगाव दाभाडे – चाकण – शिक्रापूर – न्हावरे – केडगाव चौफुला मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणारी वाहने :

तळेगाव – चाकण – खेड – मंचर – आळेफाटा मार्गे किंवा नाशिक फाटा – भोसरी – चाकण शिक्रापूर मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करणे, अपघातांना आळा घालणे आणि शहरातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!