Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Crime: पिंपरी-चिंचवड हादरलं! गुटखा न आणल्याने मामा संतापला; भाचाला मारहाण, वाचवायला गेलेल्या सख्ख्या बहिणीवर…

Pune Crime: पिंपरी-चिंचवड हादरलं! गुटखा न आणल्याने मामा संतापला; भाचाला मारहाण, वाचवायला गेलेल्या सख्ख्या बहिणीवर…

Pune Crime: पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात केवळ एका गुटख्याच्या पुडीवरून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत भयानक घटना उघडकीस आली आहे. दुकानातून गुटखा आणला नाही म्हणून पोटच्या भाच्याला बेदम मारणाऱ्या मामाला हटकणे एका माऊलीला महागात पडले. रागाच्या भरात हिंस्त्र बनलेल्या भावाने आपल्या सख्ख्या बहिणीच्या डोक्यात थेट कुऱ्हाडीने जीवघेणा वार केला. चिखली येथील मोरे वस्तीत मध्यरात्री घडलेल्या या थरारकामुळे संपूर्ण परिसरात कमालीची दहशत पसरली आहे.

‘गुटखा का आणला नाही?’ क्षुल्लक कारणावरून चिडला मामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना शनिवार, १३ जून रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. संशयित आरोपी संतोष पांडुरंग कांबळे (वय ४२, रा. चिखली) याने त्याचा भाचा रोहन याला बाजारातून गुटखा आणण्यासाठी पाठवले होते. मात्र, रोहन रिकाम्या हाताने परत आला. या क्षुल्लक गोष्टीवरून संतोषचा राग अनावर झाला आणि तो रोहनला अमानुषपणे मारहाण करू लागला.

मुलाला वाचवण्यासाठी आई धावली
आपल्या मुलाला सख्खा भाऊ बेदम मारत असल्याचे पाहून प्रियांका सचिन कदम (वय ३५) या मध्यस्थी करण्यासाठी धावल्या. त्यांनी संतोषला मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, बहीण मध्ये पडल्यामुळे आरोपी संतोषचा पारा अधिकच चढला. “तुला काय करायचे आहे?” असे ओरडत त्याने घरात पडलेली धारदार कुऱ्हाड उचलली आणि थेट प्रियांका यांच्या डोक्यात घातली. या वर्मी घावामुळे प्रियांका गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

फिर्याद दाखल; चिखली पोलिसांकडून गुन्हा नोंद
या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या प्रियांका कदम यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या सख्ख्या भावाविरुद्ध खुनी हल्ल्याची तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ हालचाली करत आरोपी संतोष कांबळे याच्याविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. कौटुंबिक वादातून आणि एका व्यसनाच्या वस्तूंवरून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे पोलीसही अचंबित झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!