Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांना पितृशोक: वडील किसनराव मोहोळ यांचे निधन

Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांना पितृशोक: वडील किसनराव मोहोळ यांचे निधन

Pune News : केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ (वय ८६) यांचे गुरुवारी (१८ जून) रात्री १०:२० वाजता पुण्यात निधन झाले. किसनराव मोहोळ यांच्या निधनाने मोहोळ कुटुंब आणि पुणेकर हळहळले आहेत.

सहकार क्षेत्रातील योगदान आणि कुस्तीची परंपरा

किसनराव मोहोळ हे एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (PDCC) तब्बल ४० वर्षे निष्ठापूर्वक सेवा बजावली होती. सहकार क्षेत्रातील योगदानासोबतच ते एक नामवंत पैलवान म्हणूनही परिचित होते. कुस्तीची ही परंपरा त्यांनी आपल्या मुलामध्येही जोपासली होती.

मुरलीधर मोहोळ यांना पैलवानकीचा वारसा आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. कोथरूड परिसरात स्थायिक असलेल्या या कुटुंबाचे कुस्तीशी घट्ट नाते राहिले आहे.

अंतिम दर्शनासाठी गर्दी

किसनराव मोहोळ यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शुक्रवारी (१९ जून) सकाळी ७ ते ९ या वेळेत कोथरूड येथील ‘वेणूकृष्णा’ या त्यांच्या निवासस्थानी व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सकाळी १० वाजता नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

मुरलीधर मोहोळ यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना कोल्हापूरमधून कुस्तीचे धडे गिरवले होते. त्यानंतर १९९६ च्या सुमारास त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून लढा दिल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

२०१७ मध्ये पुणे महानगरपालिकेत तिसऱ्यांदा निवडून आल्यावर त्यांनी स्थायी समिती अध्यक्ष आणि पुण्याचे महापौर म्हणून यशस्वी कारकीर्द गाजवली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी होत त्यांनी खासदारकी मिळवली आणि सध्या ते केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!