Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान न्याय

Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शन बंद; आता सर्व भाविकांना समान न्याय

Tuljabhavani Temple : आई तुळजाभवानी मंदिरात दर्शन व्यवस्थेत मोठे आणि महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता मंदिरात ‘व्हीआयपी’ (VIP) दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले असून, सर्व भाविकांना आता एकाच रांगेतून आणि समान अंतरावरून देवीचे दर्शन घेता येणार आहे.

यापूर्वी २०० आणि ५०० रुपयांचे विशेष पास काढून भाविकांना जवळून दर्शन दिले जात होते, ज्यामुळे सर्वसामान्य भाविकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असे. आता हे विशेष आणि सशुल्क दर्शन मार्ग बंद केल्याने दर्शनात भेदभाव राहणार नाही आणि सर्व भाविकांना समान प्राधान्य मिळेल.

ज्यामुळे दर्शन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दर्शन प्रक्रियेत बदल केला असला तरी मंदिर उघडण्याच्या आणि दर्शनाच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही.

अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील दर्शन काही काळ बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन व्यवस्था काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी ८ ते दुपारी १२:३० या वेळेत भाविकांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

अमित शहा मंदिरात दर्शनासाठी येणार असून, मंदिर संवर्धन आणि विकासकामांचा आढावा घेणार आहेत. त्यांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्ग आणि राम मंदिर जतन-संवर्धन कामांचा शुभारंभ होणार आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत, तसेच फेरीवाले आणि फूल विक्रेत्यांचे स्टॉलही हटवण्यात आले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!