Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

हृदयद्रावक! लग्नासाठी १७ कोटींचा पॅलेस बुक; पण ‘त्या’ एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत

हृदयद्रावक! लग्नासाठी १७ कोटींचा पॅलेस बुक; पण ‘त्या’ एका चुकीने लग्नाआधीच केतनचा लोहगडवर दुर्दैवी अंत

Pune News : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर एका २४ वर्षीय तरुणाचा फोटो काढताना दरीत कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतन विशाल अग्रवाल असे या मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिथे गेला होता. या दुर्घटनेने दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकी घटना काय?

केतनच्या होणाऱ्या पत्नीचा गुरुवारी (१८ जून) वाढदिवस होता. हा दिवस विशेष करण्यासाठी दोघेही सकाळी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. किल्ल्यावर भटकंती करत असताना, दरीच्या बाजूला उभे राहून फोटो काढत असताना केतनचा पाय घसरला. जमिनीचा पृष्ठभाग निसरडा असल्याने केतनचा तोल गेला आणि तो थेट खोल दरीत कोसळला.

रेस्क्यू ऑपरेशन आणि दुर्दैवी मृत्यू

ही घटना घडल्यानंतर सोबत असलेल्या तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. स्थानिक पर्यटक आणि उपस्थितांनी तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी ‘शिवदुर्ग रेस्क्यू टीम’ आणि ‘मावळ वन्यजीव पथकाला’ पाचारण केले. बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करत केतनला दरीतून बाहेर काढले, मात्र गंभीर दुखापतीमुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

स्वप्न अपूर्णच राहिले

केतन आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे लग्न येत्या नोव्हेंबर महिन्यात निश्चित झाले होते. या लग्नासाठी केतनच्या कुटुंबीयांनी जयपूर येथे तब्बल १७ कोटी रुपये खर्च करून एक आलिशान पॅलेस बुक केला होता. तसेच, पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी दोन विशेष विमानांची सोय देखील करण्यात आली होती. एका आनंदाच्या प्रसंगाच्या तयारीच्या दरम्यानच, वाढदिवसाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने लग्नाच्या तयारीचे रूपांतर शोकाकुल वातावरणात केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!