Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nasrapur Girl Death : “गाठी शेव दिली, मग पाय घसरला”; आरोपीचा खोटा दावा फसला, CCTV समोर येताच कबुली

Nasrapur Girl Death : “गाठी शेव दिली, मग पाय घसरला”; आरोपीचा खोटा दावा फसला, CCTV समोर येताच कबुली

Nasrapur Girl Death : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी वेगवेगळे दावे केले. मात्र, सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात दाखवण्यात आल्यानंतर त्याचा बचाव कोलमडला असून, फुटेजमधील व्यक्ती आपणच असल्याची कबुली त्याला द्यावी लागली.

विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आरोपीचा जबाब नोंदविताना त्याने घटनेच्या दिवशी मुलीला खाऊ दिला आणि गोठ्यात नेताना पाय घसरल्याने तिच्या डोक्याला मार लागल्याचा दावा केला. तसेच घाबरून आपण तेथून निघून गेलो, अशी भूमिका त्याने न्यायालयासमोर मांडली.

दरम्यान, चिमुकलीला सोबत घेऊन जातानाचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात सादर करण्यात आले. सुरुवातीला आरोपीने फुटेजमधील व्यक्ती आपण नसल्याचा दावा केला. मात्र, न्यायालयाने अनेक वेळा झूम करून फुटेज दाखवल्यानंतर अखेर “फुटेजमधील व्यक्ती मीच आहे,” अशी कबुली त्याने दिली. मात्र, सोबत असलेली मुलगी कोण होती हे माहीत नसल्याचे सांगत त्याने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणात विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सादर केलेल्या डीएनए अहवालामुळे आरोपीविरोधातील पुरावे अधिक भक्कम झाले आहेत. पीडितेच्या शरीरावर, गुप्तांगांवर तसेच तिच्या तोंडात कोंबलेल्या कपड्यावर आरोपीचा डीएनए आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अत्याचार आणि खून प्रकरणात आरोपीची कोंडी झाल्याचे मानले जात आहे.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून हा खटला अत्यंत वेगाने चालविण्यात आला आहे. आज या प्रकरणात अंतिम युक्तिवाद होणार असून निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, १ मे रोजी नसरापूर येथे घडलेल्या या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला आरोपीने आमिष दाखवून गोठ्यात नेल्याचा आरोप आहे. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या प्रकरणात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडित कुटुंबासह नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!