Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Omraje Nimbalkar : “रीलस्टार म्हणून हिणवणं थांबवा”; ओमराजे निंबाळकरांचा भावनिक सवाल, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Omraje Nimbalkar : “रीलस्टार म्हणून हिणवणं थांबवा”; ओमराजे निंबाळकरांचा भावनिक सवाल, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चर्चांवर आणि वैयक्तिक टीकेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “फक्त तीन दिवसांच्या चर्चेनं मी वाईट ठरलो का?” असा सवाल करत त्यांनी सोशल मीडियावरील ‘रीलस्टार’ या हिणवणीवरही नाराजी व्यक्त केली.

ओमराजे निंबाळकर यांनी सांगितले की, त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांमुळे आणि अफवांमुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही मानसिक त्रास झाला आहे. “रीलस्टार म्हणून हिणवणं केलं जातं, पण रीलस्टार असलेल्या माणसाला लोक मतं देतात का?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, धाराशिवमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील राजकीय निर्णय जाहीर केला जाईल. “आज चार वाजता कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाशी संबंधित प्रकरणांचा आणि वडिलांच्या हत्येच्या खटल्याचा उल्लेख करत भावनिक भूमिका मांडली. न्यायालयीन प्रक्रियेबाबत असमाधान व्यक्त करत ते म्हणाले की, न्याय मिळवण्यासाठी ते हायकोर्टात जाणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मतदारसंघातील एकही पंचायत समिती किंवा नगरपालिका पक्षाच्या चिन्हावर जिंकता न आल्याबद्दल त्यांनी चिंतन आवश्यक असल्याचे सांगितले. “आम्ही लोकांसाठी २४ तास काम करतो, तरीही पराभव का झाला याचा शोध घ्यावा लागेल,” असे ते म्हणाले.

त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा लढा सामान्य माणसासाठी असून पक्षनेतृत्वाबाबत कोणतीही नकारात्मक टिप्पणी करण्याचा हेतू नाही. “उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे,” असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत सस्पेन्स कायम असून ते कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय जाहीर करणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!