Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या बंडाचं महिनाभरापासून प्लॅनिंग? भावाचाच मोठा दावा

Omraje Nimbalkar : ओमराजेंच्या बंडाचं महिनाभरापासून प्लॅनिंग? भावाचाच मोठा दावा

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच आता त्यांच्या कुटुंबातूनच एक महत्त्वाचा गौप्यस्फोट समोर आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय अचानक घेतलेला नसून त्याबाबत महिनाभरापासून चर्चा सुरू होती, असा दावा त्यांचे चुलत बंधू आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंदराजे निंबाळकर यांनी केला आहे.

मकरंदराजे निंबाळकर यांनी ओमराजे यांच्या पक्षांतराच्या निर्णयापासून स्पष्टपणे स्वतःला दूर ठेवत आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतच राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ओमराजे यांच्या राजकीय निर्णयाला घरातूनच विरोध झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मकरंदराजे यांनी सांगितले की, पक्षांतराबाबत ओमराजे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र हा निर्णय आपल्याला मान्य नव्हता. “मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. २०२९ मध्येही आपण सहज निवडून येऊ शकतो, असे सांगितले. पण त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला,” असे मकरंदराजे म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीचाही उल्लेख केला. “व्यवस्थेला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे ही शिवसेनेची परंपरा आहे. पक्षाचा आदेश मिळाला आणि गरज पडली, तर ओमराजे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरायलाही मी तयार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या आगामी धाराशिव दौऱ्याची तयारी सुरू असून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे मकरंदराजे यांनी स्पष्ट केले. ओमराजे यांनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची ताकद आणि जनाधार ठाकरे यांच्यासोबतच कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीतील प्रवेशाचे स्वागत त्यांच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी ओमराजे यांचे स्वागत करत विकासाच्या राजकारणासाठी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत ओमराजेंविरोधात लढलेल्या अर्चना पाटील यांनी विकासाच्या मुद्द्यावरून अप्रत्यक्ष टोला लगावत आता जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे मत व्यक्त केले.

ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असून आगामी काळात ‘भाऊ विरुद्ध भाऊ’ अशी राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!