Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

“हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; विधानसभा अध्यक्षांवर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

“हेडमास्तरांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली”; विधानसभा अध्यक्षांवर रोहिणी खडसेंचा हल्लाबोल

Rohini khadse : मुंबईतील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत नार्वेकरांवर निशाणा साधला आहे.

विधानसभेत सुप्रसिद्ध गायिका अशा भोसले यांच्यावरील शोक प्रस्ताव मांडताना अध्यक्षांकडून झालेल्या चुका आणि मराठी भाषेतील गोंधळावरून हा वाद निर्माण झाला. याच मुद्द्यावरून राजकीय नेत्यांकडून टीकेची मालिका सुरू झाली आहे.

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत नार्वेकरांच्या भाषणावर टीका केली. “विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हेडमास्तर, पण त्यांनाच पुन्हा शाळेत घालण्याची वेळ आली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्या मते, सभागृहात मराठी भाषेच्या वापराबाबत गंभीर त्रुटी दिसून आल्या.

या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अध्यक्षांच्या भाषणशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच हा वाद अधिक पेटल्याचे दिसून येत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे विधिमंडळातील कामकाज, भाषेचा वापर आणि अध्यक्षांच्या भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!