Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

शरीराचे पाच तुकडे करून फेकले खाणीत; मोशीतील घटनेने एकच खळबळ

शरीराचे पाच तुकडे करून फेकले खाणीत; मोशीतील घटनेने एकच खळबळ

पिंपरी : बेपत्ता झालेल्या एका इसमाचा शरीराचे तुकडे केलेला मृतदेह मोशी येथील खाणीत मिळाल्याने खळबळ उडाली. बुधवारी (दि. २) सायंकाळी ही घटना उघडकीस आली असून, गुरुवारी (दि.३) दिघी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धराम प्रभू ढाले (वय ४५, रा. भोसरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धराम यांच्या यांच्या पत्नीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धराम हे २९ मार्च रोजी सकाळी घरातून कामासाठी गेले ते परत आले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते मिळून येत नसल्याने ३१ मार्च रोजी भोसरी पोलीस ठाण्यात सिद्धराम ढाले यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला. मात्र, ते आढळून आले नाहीत. २ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोशी येथील कानिफनाथ खडी मशीन समोरील खाणीमध्ये सिद्धराम यांचा मृतदेह आढळला. मात्र खाणीमध्ये त्यांचे केवळ धड होते. त्यांच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आले असून चेहरा आणि डोक्याचा भाग तसेच डावा पाय, दोन्ही हात तोडले आहेत. हे चार तुकडे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने इतर ठिकाणी टाकले आहेत. दिघी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!