Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

काळोख असलेल्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेचे स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन जणांनी केलं अपहरण; पिंपरी-चिंचवडमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडिओ

काळोख असलेल्या रस्त्याने जाणाऱ्या महिलेचे स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तीन जणांनी केलं अपहरण; पिंपरी-चिंचवडमधील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडिओ

पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरातून एका महिलेचे तीन जणांनी स्कार्पिओमधून येत अपहरण केले आहे. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील काळभोर नगर येथून मध्यरात्री एकच्या सुमारास चालत जात असलेल्या महिलेला तिघांनी जबरदस्तीने उचलून स्कार्पियो गाडीमधून अपहरण केले आहे. सीसीटीव्हीमध्ये महिला प्रतिकार करताना दिसते, तिने आरडाओरडा देखील केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कौटुंबिक वादातून सदर महिलेचे अपहरण झाल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली आहे.

तसेच सदर महिलेच्या अपहरणाचा दुसरा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ अपहरण होण्यापूर्वीची असल्याचा दावा पिंपरी चिंचवड पोलिसांकडून केला जात आहे. ज्या स्कॉर्पिओ गाडीतून महिलेचे अपहरण झाले, त्याच स्कॉर्पिओ गाडीमधून ती रस्त्याच्या मधोमध उतरल्याचे देखील दिसून येत आहे. नंतर हा पुढील प्रकार घडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळेच या घटनेची कोणीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एका प्रत्यक्षदर्शीने 112 नंबर वर फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते, मात्र संबंधित स्कॉर्पिओ गाडी आणि ती महिला ही अद्याप सापडलेली नाही. त्यानंतर पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून स्कॉर्पिओ गाडी आणि महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!