Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंदापूरच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू; तर पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी

अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इंदापूरच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू; तर पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी

लोणी काळभोर: उपजिल्हाधिकारी असलेल्या मित्राचा हळदीचा कार्यक्रम आटोपून परत जात असताना दुचाकी डिव्हायडरला धडकल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ शुक्रवारी (ता.9) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. तर, पोलीस उपनिरीक्षक असलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.

समाधान संभाजी भिटे (वय-31, रा. निर निंबगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तर मयूर सुनील डोंगरे (वय-29, रा. मुंबई) असे जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान भिटे हा पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तर त्याचा मित्र मयूर डोंगरे हा मुंबईमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. उपजिल्हाधिकारी असलेल्या त्यांच्या मित्राचा विवाह ठरला होता. त्याचा विवाह सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका मंगल कार्यालयात होणार आहे. उपजिल्हाधिकारी मित्राचा हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.9) पार पडला, तर विवाह शनिवारी (10) होणार आहे.

दरम्यान, समाधान भिटे व मयूर डोंगरे हे दोघेही हळदीच्या कार्यक्रमाला शुक्रवारी आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दोघेजण दुचाकीवरून परत निघाले होते. समाधान हा गाडी चालवत होता. तर मयूर डोंगरे हा पाठीमागे बसला होता. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जात असताना, अंधारात कवडीपाट टोलनाक्याजवळचा डिव्हायडर न दिसल्याने दुचाकी थेट डिव्हायडरला धडकली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोनटक्के, पोलीस हवालदार बापू वाघमोडे, विजय जाधव तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना तत्काळ लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. दोन्ही जखमींवर उपचार सुरु होते.

समाधान भिटे याच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागला होता. समाधानचा शनिवारी (ता. 10) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पोलीस उपनिरीक्षक मयूर डोंगरे यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.

समाधानच्या घरची परिस्थिती हलाखीची

समाधान भिटे हा अतिशय हुशार आणि कष्टाळू विद्यार्थी होता. त्याच्यासोबत त्याचा लहान अक्षय हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. समाधान याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याचे कुटुंब अल्पभूधारक आहे. वडील गाई सांभाळून त्या विकण्याचा व्यवसाय करतात, तर आई अंगणवाडी सेविका आहे. समाधान आणि अक्षय हे आर्थिक अडचणीमुळे दोघात एकच जेवणाचा खाऊन अभ्यास होते. एक अत्यंत हुशार आणि कष्टाळू विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!