Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड भाजप अध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची नियुक्ती

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी तथा भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांनी पत्राद्वारे याबाबतची घोषणा बुधवारी (ता. 13) केली. या निवडीमुळे शहर भाजपमधील बरीचशी नाराजी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी नगरसेवक असलेले शत्रुघ्न काटे हे आपल्या विद्यार्थीदशेपासून विद्यार्थी चळवळीत आहेत. शिवाय मागील वीस वर्षांपासून विविध समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय आहेत. सामाजिक काम, नम्र स्वभाव व सुसंस्कृत उच्च शिक्षित चेहरा यामुळे साधारण तीन टर्म पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रू भागातून भरघोस मतांनी निवडून येणारे ते नगरसेवक आहेत. त्यांनी २०१४ मध्ये भाजप पक्षात प्रवेश केला आणि गेल्या दहा वर्षांपासून ते पक्ष विस्ताराकरिता संघटनेचे काम उत्तमरित्या करत आहेत.

दरम्यान मागील दहा वर्षात त्यांना भाजपा पक्षाकडून कोणतेही महत्वाचे पद दिले नाही .त्यामुळे काटे यांनी नाराजी व्यक्त करत थेट जगताप कुटुबिंयाविरोधात आवाज उठविला होता. भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजी वाढू नये म्हणून काटे यांना शहराध्यक्षपद देण्यात आल्याची चर्चा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!