सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि अक्कलकोटचे माजी आमदार तसेच माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी काँग्रेसला रामराम केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धराम म्हेत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ३१ मे रोजी म्हेत्रे हे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.


