हडपसर (पुणे): फुरसुंगीमध्ये पंधरा वर्षाच्या मुलीचे सतरा वर्षाच्या मुलासोबत प्रेम संबंध होते, मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाला नकार दिल्याने मुलीने घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुरसुंगी परिसरात अडीच महिन्यांपूर्वी घडली होती झाली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी मंगळवारी (दि. २७) फुरसुंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगला मोडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी परिसरातील १५ वर्षाची मुलगी व १७ वर्षाचा मुलगा हे दोघे शेजारी राहतात. दोघेही एकाच शाळेमध्ये शिक्षण घेतात. त्यांचे अनेक वर्ष पासून प्रेम संबंध होते. घराशेजारी राहत असल्याने दोघांच्या नेहमी भेट होत होती, दोघे एकत्र जेवणही करत असे. त्याचबरोबर दोन्ही परिवाराचा एकमेकांशी चांगला संपर्क आहे. दोघांच्याही पालकांना असे काही आपल्या मुलांचे प्रेम संबंध आहेत, हे त्यांना माहीत नव्हते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी दोघांनी त्यांना लग्न करायचे आहे, असे आपल्या आई-वडिलांना सांगितले. मात्र, मुलगा १७ केवळ वर्षाचा असल्याने मुलाकडील नातेवाईकांनी लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर शेजारीच राहत असलेल्या पंधरा वर्षाच्या मुलीने घरात कोणी नसताना ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगला मोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


