Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेना; सोलापुरातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेना; सोलापुरातील माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर : उद्धव ठाकरेंच्या पक्षातील गळती सुरूच आहे. सोलापूर मधील करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत एकनाथ शिंदेच धनुष्यबाण हाती घेतलं आहे. जयवंतराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असून, सोलापुरात ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे.

दोन दिवसांपूर्वीच सांगलीतील पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. तर काल (मंगळवार ९ जून) आणखी दोन निष्ठावंतांनी शिंदे गटात प्रवेश करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला. अमरावतीतील दोन वेळचे आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील आणि त्यांचा मुलगा युवासेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला.

अशातच आता सांगली, अमरावती पाठोपाठ सोलापुरातून देखील ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरु करण्यात आले होते. याचे रिझल्ट आता यायला लागले असून, उद्धव ठाकरे गटातील निष्ठावान नेते एक-एक करून आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!