Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

YouTube चा मोठा निर्णय..! आता प्रत्येकालाच Live Stream करता येणार नाही; ‘या’ तारखेपासून वयोमर्यादेचे नवे नियम लागू

YouTube चा मोठा निर्णय..! आता प्रत्येकालाच Live Stream करता येणार नाही; ‘या’ तारखेपासून वयोमर्यादेचे नवे नियम लागू

मुंबई : YouTube युजर्ससाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता प्रत्येकालाच YouTube वर Live Stream करण्याची मुभा मिळणार नाही, कारण गुगलने आपल्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. २२ जुलैपासून हा नवा नियम लागू होणार असून, Live Stream करण्यासाठी किमान वयाची अट लागू केली जाणार आहे.

काय आहे नवीन नियम?

गुगलने आपल्या सपोर्ट पेजवर नवी पॉलिसी जाहीर करत सांगितले आहे की, २२ जुलैपासून YouTube वर Live Stream करण्यासाठी वापरकर्त्याचे वय किमान १६ वर्षे असणे आवश्यक आहे. यापूर्वी ही वयोमर्यादा १३ वर्षे होती. मात्र, सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

१६ वर्षांखालील मुलांना Live Stream करता येणार?

नवीन धोरणांनुसार, १६ वर्षांखालील मुलांना पूर्णतः Live Stream करता येणार नाही. परंतु, त्यांना काही विशिष्ट सुरक्षा अटींचे पालन करणे बंधनकारक असेल.

उदाहरणार्थ: Live Stream करताना प्रौढ व्यक्तीची उपस्थिती आवश्यक असेल. प्रौढ व्यक्तीशिवाय मुलगा किंवा मुलगी Live गेल्यास, YouTube त्वरित ते Live बंद करून चॅट देखील अक्षम करेल. पालकांना चॅनेल मॅनेजर म्हणून नियुक्त करणे आवश्यक असेल, म्हणजे खात्याचा पूर्ण अ‍ॅक्सेस पालकांकडे असेल.

लहान मुलांसाठी YouTube चे सुरक्षित फीचर्स

YouTube लहान मुले आणि तरुण युजर्ससाठी सुरक्षिततेवर आधारित अनेक उपाययोजना आधीच करत आहे. यामध्ये:

– पर्यवेक्षित खाते (Supervised Account)
– ‘Made for Kids’ कंटेंट कॅटेगरी

यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. याशिवाय, YouTube वेळोवेळी तरुण युजर्सना प्रायव्हसी आणि सिक्युरिटीविषयी जागरूक करत असतो.

गुगलचा हा निर्णय सायबर गुन्ह्यांपासून लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. Live Stream करण्यासाठीची नवीन वयोमर्यादा आणि सुरक्षा अटी यामुळे YouTube अधिक सुरक्षित आणि जबाबदार व्यासपीठ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!