Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

”विद्यार्थ्यांची डोकी उडतील, आम्ही शाळेत बॉम्ब ठेवलाय”; पुण्यातील औंधमध्ये खळबळ, पुढे काय नेमकं घडलं?

”विद्यार्थ्यांची डोकी उडतील, आम्ही शाळेत बॉम्ब ठेवलाय”; पुण्यातील औंधमध्ये खळबळ, पुढे काय नेमकं घडलं?

पुणे: शहरातील औंध येथील सिटी इंटरनॅशनल स्कूल या नामांकित शाळेच्या अधिकृत ईमेलवर ३० जून २०२५ रोजी सकाळी ११.५० वाजता एक धक्कादायक धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवली असल्याची आणि तातडीने इमारत रिकामी न केल्यास अनेकांचे मृत्यू होतील, विद्यार्थ्यांची डोकी, हात-पाय उडतील अशी गंभीर धमकी देण्यात आली होती. मेलमध्ये “आम्ही रोडकिल आणि क्यो या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या.” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता.

प्राचार्यांनी दाखवलेली तत्परता आणि पोलिसांची कारवाई

या मेलची माहिती मिळताच शाळेच्या प्राचार्या अपूर्वा पाटील यांनी तात्काळ चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या लँडलाइनवर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक, अँटी टेररिस्ट सेल (ATC), गुप्त विभागाचे अधिकारी आणि बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले.

बीडीडीएस पथकाचे अधिकारी डिओ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर बीडीडीएस पथकाने लेखी प्रमाणपत्र देत कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू सापडली नसल्याचे स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान दोन पोलीस अधिकारी आणि १२ अंमलदार शाळेसमोर बंदोबस्तासाठी तैनात होते.

इतर शाळांनाही सतर्कतेच्या सूचना

या घटनेनंतर चतु:श्रृंगी पोलिसांनी डीएव्ही पब्लिक स्कूल (औंध) आणि लॉयला स्कूल (पाषाण रोड) या शाळांना भेट देऊन त्यांच्या प्राचार्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धमकीचा मेल ‘roadkillkyo’ या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला आणि यामागे नेमकं कोणतं नेटवर्क आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.या संपूर्ण प्रकरणामुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, शाळा प्रशासनाची तत्परता आणि पोलिसांची वेळेवर कारवाई यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेने शालेय सुरक्षेबाबतची सजगता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!