पुणे: वडगाव बुद्रुक परिसरात आज (दि. १) दुपारी श्री गजानन ज्वेलर्समध्ये दुपारी दीड वाजता दरोड्याची घटना घडली. तीन दरोडेखोरांनी दुकानात घुसून पाच तोळे सोने लंपास केले.
या दरोड्यात दुकानातील एका महिलेला मारहाण झाली असून ती किरकोळ जखमी झाली आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.


