Today शुक्रवार, 12th जून 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘या’ राशींना आजचा दिवस अनुकूल; मेष ,वृषभ राशीवाल्यांना सतावू शकते चिंता

‘या’ राशींना आजचा दिवस अनुकूल; मेष ,वृषभ राशीवाल्यांना सतावू शकते चिंता

मेष: मनोबल कमी राहील, आज महत्त्वाची कामे नकोत. काहींना विनाकारण एखादी चिंता सतावणार आहे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. वादविवादात सहभाग टाळावा, अकारण एखादा मनस्ताप संभवतो .

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल, वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राहील, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : अकारण कोणत्याही गोष्टीची चिंता करु नये. मन शांत ठेवावे, आपली विनाकारण चिडचिड होणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत, काहींना अनपेक्षितपणे कोणतातरी दंड भरावा लागेल.

कर्क: व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. काहींचे नवीन परिचय होतील. नवे स्नेहसंबंध जुळतील. विविध लाभ होतील.

सिंह: मनोबल उत्तम राहील. तुमच्या कामामध्ये तुमची प्रगती होईल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस आपणाला अनेकदृष्टीने अनुकूल आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे.

कन्या: निद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाणार आहात. तुमची जिद्द वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल वाढेल.

तुळ: आर्थिक कामे विनासायास पूर्ण होतील, व्यवसायिकांना आजचा दिवस विशेष लाभाचा ठरेल. जुनी येणी वसूल होतील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल.

वृश्चिक: मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक कामे मार्गी लावणार आहात. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष प्रभाव पडणार आहे. वैचारिक प्रगती होईल.

धनु: मानसिक अस्वस्थता असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामात रस वाटणार नाही. काहींचा आराम करण्याकडे कल राहील. खर्च वाढणार आहेत, मनोबल कमी
असणार आहे. प्रवासात काळजी घ्यावी.

मकर: अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्य उत्तम राहील. मनोबल चांगले असणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील.

कुंभ: आजचा दिवस आपल्याला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. प्रवास सुखकर होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. तुमच्या कामाची गती विशेष असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होतील.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. तुमची अपेक्षित प्रगती तुम्ही साध्य करणार आहात. काहींना गुरुकृपा लाभेल. एखाद्या तीर्थक्षेत्री भेट देणार आहात, प्रवास सुखकार होतील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!