पुणे : ‘केसरी’चे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि.१६) पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पाठीमागे मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक आणि नातवंडे असा परिवार आहे. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले.
टिळक स्मारक मंदिर, वसंत व्याख्यानमाला, हिंदू महिला अनाथ आश्रम, वेदशास्त्त्रोत्तेजक सभा या संस्थांचे ते अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते विद्यमान कुलपती होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला डॉ. यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा त्यांनी पुढे नेला.


