Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली; घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम: प्रॉपटायगर डॉटकॉम

जून तिमाहीत घरांची विक्री मंदावली; घर परवडण्याबाबतच्या चिंता कायम: प्रॉपटायगर डॉटकॉम

मुंबई: डिजिटल रिअल इस्टेट ट्रान्सॅक्शन अँड अ‍ॅडव्हायझरी प्लॅटफॉर्म प्रॉपटायगर डॉटकॉम च्या अलीकडच्या अहवालानुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किमतींबाबत चिंता करणाऱ्या खरेदीदारांनी थोडे थांबून वाट बघण्याचा दृष्टिकोन अंगिकारला, ज्यामुळे या तिमाहीत भारतातील ८ प्रमुख निवासी बाजारपेठांमध्ये घरांची विक्री वार्षिक १४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

हाऊसिंग डॉटकॉमचे स्वामित्व ज्यांच्याकडे आहे त्या आरईए इंडियाचाच एक भाग असलेल्या प्रॉपटायगर डॉटकॉमने सादर केलेल्या रिअल इन्साईट रेसिडेन्शियल – एप्रिल-जून २०२५ अनुसार, बंगळूरू, चेन्नई आणि कोलकाता वगळता सर्व शहरांमध्ये घरांच्या विक्रीचे प्रमाण कमी झाले. या तिमाहीत सर्वात तीव्र घट दिसून आली ती एमएमआर (-३२ टक्के) आणि पुणे (-२७ टक्के) येथे. क्रमिक आधारावर, एकंदर विक्री स्थिर राहिली, तर काही बाजारपेठांमध्ये वृद्धीदेखील दिसली. एमएमआर (२७ टक्के) आणि पुणे व बंगळूरू (प्रत्येकी १६ टक्के) यांचे त्रिमासिक विक्रीत सर्वाधिक योगदान होते.

आकडेवारीत त्यांचा एकत्रित वाटा ५९ टक्के होता. याबाबत प्रॉपटायगर डॉटकॉमचे हेड ऑफ सेल्स श्रीधर श्रीनिवासन म्हणाले की, घरांच्या विक्रीत आणि नवीन लॉन्चमध्ये थोड्या काळासाठी झालेली ही घसरण मागणी कमी झाल्याची सूचक नसून, ते पुनःअंशन आहे. खास करून बजेट आणि मध्यम उत्पन्न असलेल्या सेगमेन्टमध्ये ‘आपल्याला घर परवडणार का’ या दबावामुळे खरेदीदार अधिक सावध झाले आहेत. तथापि, मागणी मात्र तशीच आहे, ज्याचा पुरावा काही शहरांमधील क्रमिक वृद्धीमधून तसेच एमएमआर, पुणे आणि बंगळुरूसारख्या मुख्य बाजारांच्या निरंतर प्रभुत्वामधून मिळतो. यंदा पहिल्या सहामाहीत धोरणात्मक जमीन अधिग्रहणाच्या लाटेत विकासकांची गुंतवणूक चालू ठेवण्याची (विशेषतः प्रीमियम ऑफरिंग्जमध्ये) इच्छादेखील स्पष्ट दिसत आहे. यातून भारताच्या हाऊसिंग बाजारात दीर्घकालीन विश्वासाचा संकेत मिळतो.

मंदीमुळे नवीन लॉन्चची संख्या कमी झाली

या अहवालात दिसून येते की, दुसऱ्या तिमाहीत जिओपॉलिटिकल कारकांचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे नवीन घरांचा पुरवठा मागील तिमाहीच्या आणि मागील वर्षाच्या तुलनेतदेखील कमी झाला आहे. या तिमाहीतच भारत आणि शेजारी देश पाकिस्तान यांच्यातील सीमा संघर्ष टोकाला गेला होता आणि दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केला होता. शहरनिहाय विश्लेषणात वेगवेगळे ट्रेंड दिसतात. एमएमआर, पुणे आणि अहमदाबाद येथे नवीन लॉन्चमध्ये घसरण झालेली दिसते, तर इतर बाजारपेठांमध्ये वाढ झालेलीही दिसते. कोलकातामध्ये जून तिमाहीत लॉन्चचे प्रमाण तिपटीने वाढलेले दिसते, ज्याचे कारण प्रामुख्याने त्यांचा बेस कमी असणे हा होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!