Today मंगळवार, 26th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक कामात लाभणार सुयश; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

‘या’ राशींच्या लोकांना आर्थिक कामात लाभणार सुयश; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव
वाढणार आहे.

वृषभ : तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

कर्क : मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.

कन्या : अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे.

तुळ : महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे.

वृश्चिक : चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील.

धनु : मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.

मकर : व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल, अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे.

मीन : कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!