नवीन पनवेल : औषधाच्या दुकानाचे शटर वाकवून आत शिरलेल्या चोरट्याने या दुकानाच्या गल्ल्यातून १७ हजार रुपये आणि काही औषधे चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
हर्ष नावंधर यांचे नवीन पनवेल, शॉप नंबर १४, हरी आशीर्वाद अपार्टमेंट, सेक्टर १५ ए येथे जनरिक मेडिको नावाचे औषधाचे दुकान आहे. १२ जुलै रोजी त्यांच्या मेडिकलमध्ये चोरी झाल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


