Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बुमराहला दुखापत करून सामना जिंकायचा; बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरचा धोकादायक प्लॅन समोर आला

बुमराहला दुखापत करून सामना जिंकायचा; बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरचा धोकादायक प्लॅन समोर आला

नवी दिल्ली: लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेल्या टीम इंडियाला २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात इंग्लंडचा एक धोकादायक प्लॅन समोर आला आहे, जो त्यांनी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्ध केला होता, कारण बुमराह आणि रवींद्र जडेजा सामन्याच्या पाचव्या दिवशी नवव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला विजयाकडे घेऊन जात होते. यामुळे इंग्लंडचा कॅम्प संतापला आणि कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांनी बुमराहला जखमी करून सामना जिंकण्यासाठी धोकादायक योजना आखली. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने हा खुलासा केला आहे.

मोहम्मद कैफने केला दावा
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना दावा केला की, लॉर्ड्स कसोटी सामन्यात १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बुमराह आणि जडेजाने नवव्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी करून इंग्लंडची चिंता वाढवली होती. यावेळी यजमान संघाने जाणीवपूर्वक बुमराहवर बाऊन्सरचा वर्षाव करून त्याला जखमी करण्याचा कट रचला.

कर्णधार बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर यांना विश्वास होता की, जर ते बुमराहला बाद करू शकले नाहीत तर ते मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीपूर्वी किमान त्याला दुखापत करू शकतात. बुमराहने दुसऱ्या डावात 54 चेंडूत 5 धावा केल्या. त्याने रवींद्र जडेजासोबत मिळून २२ षटकांत ३५ धावा जोडून संघाला विजयाच्या जवळ नेले.

खांद्याला किंवा बोटाला इजा करण्याची योजना 
कैफ पुढे म्हणाला, “स्टोक्स आणि आर्चर बुमराहविरुद्ध बाऊन्सर टाकण्याची योजना आखत होते. त्यांना बुमराहच्या खांद्याला किंवा बोटाला दुखापत करायची होती. यावेळी आर्चरचा एक चेंडू बुमराहच्या बोटावर लागला, पण ती गंभीर दुखापत नव्हती. मात्र, इंग्लंडचा प्लॅन यशस्वी झाला आणि बुमराह चुकीचा शॉट खेळून स्टोक्सचा बळी ठरला.

बुमराह मँचेस्टरमध्ये खेळणार का?
इंग्लंडविरुद्धकसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच जसप्रीत बुमराह केवळ तीन कसोटी सामने खेळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. अशा तऱ्हेने बुमराह मँचेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मात्र त्याला चौथ्या सामन्यात खेळण्याचे आवाहन क्रिकेट तज्ज्ञांकडून केले जात आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी जिओस्टारशी बोलताना सांगितले की, बुमराहच्या अनुपस्थितीमुळे भारताचा पराभव निश्चित होईल आणि आम्ही मालिकाही गमावू. जर मी संघ व्यवस्थापनाचा भाग असतो, तर बुमराहला पुढील सामना खेळण्यास नक्कीच सांगेन कारण ते महत्वाचे आहे. जर तो खेळला नाही आणि मग आपण कसोटी सामना गमावला तर सर्व संपले. बुमराहने शेवटचे दोन कसोटी सामने खेळले पाहिजेत, असे मला वाटते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!