नागपूर : प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेअंतर्गत २३ व २४ जुलैला नागपूर-नाशिक रोड विशेष अनारक्षित गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१२०६ नागपूर येथून रात्री ७.३० वाजता प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल.
या गाडीला एकूण १८ कोच आहेत. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळसगाव व मनमाड या स्थानकांवर थांबा राहणार आहे.


