Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मँचेस्टर कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, 8 वर्षांनंतर परतला ‘हा’ खेळाडू

मँचेस्टर कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, 8 वर्षांनंतर परतला ‘हा’ खेळाडू

लंडन: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेल्या यजमान इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे इंग्लंडने कसोटी सामन्याच्या 24 तास आधी नव्हे तर 43 तास आधी आपल्या 11 खेळाडूंची नावे जाहीर केली. कसोटी मालिकेतील चौथा सामना २३ जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर सुरू होणार असून त्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेईंग-११ मध्ये बदल केला आहे. फिरकीपटू लियाम डॉसनने तब्बल 8 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर संघात पुनरागमन केले आहे.

इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाचा २२ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात इंग्लंडकडून फिरकीपटू शोएब बशीरने शेवटची विकेट घेतली. पण बोटाच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर पडल्याने बशीरची विकेट हे त्याचे या मालिकेतील शेवटचे काम ठरले. इंग्लंडच्या निवड समितीने डावखुरा फिरकीपटू लियाम डॉसनचा चौथ्या आणि पाचव्या कसोटीसाठी संघात समावेश केला आहे.

नायर सारखी डॉसनची कहाणी
इंग्लंडने डॉसनच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये एकच बदल केला आहे. म्हणजेच खराब फॉर्म असूनही सलामीवीर जॅक क्रॉली, उपकर्णधार ओली पोप आणि वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. डॉसनबद्दल बोलायचे झाले तर या ३५ वर्षीय खेळाडूची कहाणीही भारतीय संघाचा फलंदाज करुण नायरसारखीच आहे.

नायरप्रमाणेच डॉसननेही 2016 च्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत पदार्पण केले होते, परंतु 3 सामन्यांनंतर 2017 मध्ये तो बाद झाला होता. यानंतर नायर जसा या इंग्लंड मालिकेतून परतला तसाच या इंग्लिश फिरकीपटूलाही दुसरी संधी मिळाली आहे. डॉसनने 3 टेस्टमध्ये फक्त 84 धावा केल्या आहेत आणि 7 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर त्याने 212 सामन्यात 18 शतकांसह 10731 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याच्या नावावर ३७१ विकेट्सही आहेत, ज्यात त्याने १५ वेळा एका डावात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडची प्लेइंग-११
बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ, लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्से आणि जोफ्रा आर्चर.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!