Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! भोकरदनमध्ये आदिवासी वसतिगृहात पहिलीच्या विद्यार्थ्याचा खून

धक्कादायक! भोकरदनमध्ये आदिवासी वसतिगृहात पहिलीच्या विद्यार्थ्याचा खून

भोकरदन: गणपती इंग्रजी माध्यम शाळेतील निवासी आदिवासी वसतिगृहातील सात वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. बालवीर अजय पवार (७) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून, तो इयत्ता पहिलीत शिकत होता. दोन दिवसांपूर्वी काही विद्यार्थ्यांसोबत बालवीरचा वाद झालेला होता, त्याच वादातून वसतिगृहातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी रात्री त्याचा गळा आवळून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर बालवीर वसतिगृहातील आपल्या रूममध्ये झोपला होता. सकाळी इतर विद्यार्थी झोपेतून उठले. मात्र, बालवीर उठत नसल्याने काहींनी त्याचा श्वास तपासला असता तो श्वास घेत नसल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलिसांना कळविण्यात आले. त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याच्या गळ्यावर आवळण्याच्या खुना आढळून आल्याचे शाळा प्रशासनास व नातेवाईकांच्या लक्षात आले.

दरम्यान, मयत मुलाची आई सखू अजय पवार (२५, रा. पाडळी, ता. परतूर) यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. भोकरदन येथील श्री गणपती हॉस्टेल येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून २८ ऑगस्ट २०२४ मध्ये त्याला दाखल केले होते. यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १० जुलै रोजी मुलगी गौरी व मुलगा बालवीर यांना शाळा सुरु झाल्यामुळे श्री गणपती हॉस्टेल भोकरदन येथे सोडण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी (दि. २२) शाळेतून निरोप आल्यानंतर भोकरदन येथे मयत मुलाची आई व अन्य नातेवाईक आले. त्यांनी मृतदेह पाहिला असता गळ्यावर आवळण्याचे निशान दिसले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!