Today बुधवार, 29th एप्रिल 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘या’ राशींच्या लोकांना प्रवास करताना घ्यावी लागणार काळजी; वाचा आजचे राशिभविष्य सविस्तर

‘या’ राशींच्या लोकांना प्रवास करताना घ्यावी लागणार काळजी; वाचा आजचे राशिभविष्य सविस्तर

मेष : दुपारनंतर तुमचे मनोबल वाढेल. दैनंदिन कामे तसेच इतर महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.

वृषभ : दुपारनंतर अनावश्यक खर्च संभवतात. मनोबल कमी राहील. वाहने सावकाश चालवावीत. कामाचा ताण वाढणार आहे. अनावश्यक कामात वेळ जाईल. मानसिक ताणतणाव राहतील.

मिथुन : नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे दुपारपूर्वी करावीत. मानसिक प्रसन्नता लाभेल. उत्साही रहाल. तुमच्या कामाने अनेक जण प्रभावित होणार आहेत. आनंदी घटना घडेल.

कर्क : जिद्दीने कार्यरत रहाल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामात सुयश लाभेल. कामाचा ताण असला तरी कामे उरकणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत.

सिंह: आर्थिक कामे दुपारपूर्वी करावीत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास होतील. कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य व समाधान लाभणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

कन्या : महत्त्वाची आर्थिक कामे दुपारनंतर करावीत. तुमचा प्रभाव वाढेल. अनेक कामात सुयश लाभेल. प्रवासाचे योग येणार आहेत. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात.

तुळ : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता कमी होईल. उत्साह वाढेल. प्रवास होतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तुमच्या कामाची उचित दखल घेतली जाईल.

वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारपर्यंत करावीत. दुपारनंतर मनोबल कमी राहील, प्रवास नकोत. वाहने जपून चालवावित. आज आपणाला दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. दगदग व त्रास होईल.

धनु : नोकरी, व्यवसायातील आर्थिक कामे दुपारनंतर होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पडतील, आर्थिक लाभ होतील. दुपारनंतर अनपेक्षितपणे प्रियजन भेटणार आहेत. कामाचा ताण कमी होईल.

मकर: मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. तुमचा प्रभाव राहोल. भाग्यकारक अनुभव येतील. काहींना मानसन्मान लाभेल. तुम्ही आपली मते इतरांवर लादणार आहेत.

कुंभ : दुपारनंतर तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामातील अडचणी दुपारनंतर कमी होतील. प्रवासात काळजी घ्यावी.

मीन : दुपारनंतर मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्य सांभाळावे. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. काहींना एखादया मनस्तापदायक घटना संभवते. मनोबल कमी राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!