Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राजकीय आदेश न जुमानल्याने जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

राजकीय आदेश न जुमानल्याने जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोलीला बदली; आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप

जामखेड: जामखेडच्या तहसीलदारांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली असून या बदलीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात मात्र राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठीची गटरचना करताना विशिष्ट गटात सोयीच्या विशिष्ट गावांचा समावेश करण्याचा सत्ताधाऱ्यांचा आदेश न जुमानल्याने तहसीलदारांची गडचिरोलीला बदली करण्यात आल्याचा आरोप आमदार रोहित यांनी केला आहे. दरम्यान, बदलीप्रकरणी पवार यांनी सभापती राम शिंदे यांचा बेट नामोल्लेख टाळून त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या बदलीचा मंगळवारी आदेश निघाला असून त्यांची धानोरा (जि. गडचिरोली) येथे बदली करण्यात आली आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने जामखेडच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हा परिषदेच्या गटरचनेचे काम सुरु आहे. जामखेड तालुक्यात साकत, खर्डा आणि जवळा असे तीन गट असून यातील काही गटातील गावे ही दुसऱ्या गटात समाविष्ट करण्याचा आदेश ‘वरून’ देण्यात आला होता. परंतु, सत्ताधारी असो की विरोधक त्यांच्या राजकीय आदेशापेक्षा नियमाला महत्त्व देणारे तहसीलदार गणेश माळी यांनी या आदेशाचे पालन केले नाही.

यावरून वजनदार सत्ताधारी नेत्याने संबंधित अधिकाऱ्याच्या अंगावर फाईलच भिरकावल्याची जोरदार चर्चा आहे. वॉर्ड रचना असो, गट रचना असो किंवा गण रचना ही सत्ताधाऱ्यांकडून नेहमीच आपल्या सोयीची केली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे आणि संबंधित तहसीलदारांची बदली थेट गडचिरोलीला करण्यात आल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

हाती सत्ता असल्याने काही नेत्यांना अहंकाराची बाधा झाली आहे. मग नियमात नसलेल्या कामासाठीही अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात असून नियमबाह्य आदेशाचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्याची दुर्गम भागात बदली केली जाते. अधिकाऱ्यांना प्रामाणिकपणाची शिक्षा मिळत असेल, तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची कशी अपेक्षा करता येईल? त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्तेच्या धुंदीतून बाहेर यावं. अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांची धुंदी उत्तरवल्याशिवाय राहणार नाही.

-रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!